आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय मसाले अमेरिकी नागरिकांना सोसवेना, आरोग्याच्या पातळीवर धोकादायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - मसाल्यांचा निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख आहे. मात्र आरोग्याच्या पातळीवर भारतीय मसाल्याचे पदार्थ धोकादायक ठरत असल्याच्या भीतीने अमेरिकेने या पदार्थांची कडक चाचणी करूनच त्याला वापराची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय मसाल्यांचे खाद्यपदार्थ आरोग्याला बाधा आणणारे ठरू शकतात, असे निदर्शनास आल्यामुळे त्याची चाचणी केली जाणार आहे. अमेरिकेच्या फेडरल ड्रग अँडमिनिस्ट्रेशन (एफडीए) विभागाने हा निर्णय घेतला असून त्यावर कारवाई प्रक्रिया सुरू झाली आहे. अमेरिकेने 2009 ते 2013 या काळात भारतातून आयात केलेल्या मसाल्यांच्या पदार्थांमध्ये विशिष्ट विषारी घटक सापडल्याचा दावा एफडीएने केला आहे. त्यामुळे भारतीय मसाल्यांमुळे मासे, दूध, अंडी आणि भाजीपाल्यामध्ये विषाणूची बाधा झाल्याचे आढळून आल्याचा दावा अमेरिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती अद्याप प्रकाशित झालेली नाही. 2007 ते 2009 या दरम्यान भारतातून आयात करण्यात आलेल्या एकूण मालापैकी 7 टक्के पदार्थ दूषित असल्याचे दिसून आले आहे. दूषित मसाल्यांच्या आयात पदार्थांमध्ये मेक्सिकोचा क्रमांक पहिला आहे. दुसर्‍या स्थानी भारत आहे. दरम्यान, भारताने गेल्या वर्षी 5. 75 लाख टन मसाले व मसाल्यांचे पदार्थ निर्यात केले होते. त्याची किंमत सुमारे 9 हजार 700 कोटी रुपये आहे. दुसरीकडे एफडीएने मसाल्यांच्या पदार्थांची तपासणी करण्यासाठी नवी दिल्ली, मुंबईमध्ये मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यात 12 निरीक्षक आहेत. त्यात 19 सदस्यांनी वाढ करण्यात येणार आहे.
भारतीय कंपन्यांना इशारा : भारतीय मसाल्यांच्या पदार्थांमध्ये आढळून येणार्‍या विषारी घटकाबद्दल 200 भारतीय कंपन्यांना अमेरिकी प्रशासनाने इशारा दिला आहे.


काय आहे ठपका ?
भारतीय मसाल्याच्या पदार्थांमध्ये सॅलमॉनीला नावाचा विषाणू आढळून आल्याने अमेरिकी प्रशासन हादरले आहे. या विषाणूमुळे संसर्गजन्य रोग होण्याचा धोका वाढतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यात डायरिया, ताप, पोटाचे विकार होत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे हे आजार 12 ते 72 तासांच्या आत होण्याचा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने पदार्थांची कडक चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.


कोणते घटक ?
सिमला मिरची, जिरे, धने, कोथिंबीर, तुळस, काळी मिरची, हळद या पदार्थांमधून विषारी घटक सापडल्याचे अमेरिकी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या घटकांची यापुढे कडक तपासणी झाल्यानंतरच त्याला परवानगी दिली जाणार आहे.