आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय विडीला अमेरिकेत बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) भारतीय विडीवर बंदी लादली आहे. एफडीएचे काटेकोर निकषांचे पालन केले जात नसल्याचे सांगून पुण्याच्या जश इंटरनॅशनल कंपनीच्या तीन प्रकारच्या विड्यांना अमेरिकेत विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सूत्र विडी रेड,सूत्र विडी रेड कोन आणि सूत्र विडी मेंथॉल कोन या तंबाखू उत्पादनांच्या विक्रीसाठी लागणा-या निकषांचे पालन न झाल्याने विड्या विकण्यायोग्य नाहीत असा शेरा अमेरिकी एफडीएने मारला आहे. सन 2009 च्या कुटुंब धूम्रपान प्रतिबंधक आणि तंबाखू नियंत्रण कायद्यान्वये ही बंदी आहे. विशेष म्हणजे बंदी घातलेले हे पहिलेच उदाहरण आहे. यापूर्वी अमेरिकेत तंबाखू उत्पादनांवर निगराणी नव्हती.परंतु सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्याच्या दृष्टीने तंबाखूच्या उत्पादनांचा फेरआढावा घेऊन कोणती उत्पादने विक्रीसाठी योग्य आहेत याचे अधिकार एफडीएला मिळाले आहेत, असे एफडीएच्या तंबाखू उत्पादन केंद्राचे संचालक मिच झिलर यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी वोक्हार्ट, रॅनबॅक्सीच्या औषधांनाही मनाई अमेरिके कडून मनाई करण्यात आली आहे.
वोक्हार्ट, रॅनबॅक्सीच्या औषधांनाही मनाई
सूडबुद्धीने कारवाई नाही : प्रमुखाचे स्पष्टीकरण, भारतीय कंपन्यांवर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत नसल्याचा खुलासा अन्न आणि औषध प्रशासनाच्या महिला प्रमुखांनी केला आहे.अमेरिकेत आयात होणा-या प्रत्येक उत्पादनांच्या दर्जाबाबत कडक निकष आहेत. भारतीय कंपन्यांवर सूड उगवला जात नाही. उत्पादनांची तपासणी करूनच कारवाई करतो, असे मार्गरेड हॅम्बर्ग यांनी सांगितले.
तंबाखू नियमन कायद्याचा भंग
तंबाखू नियमन कायद्याच्या तरतुदीनुसार निकष पूर्ण करण्यात जेश इंटरनॅशनल अपयशी ठरली आहे. उत्पादनाची तारीख कोणतीही असो ही चार उत्पादने यापुढे अमेरिकेत आयात करता येणार नाहीत अथवा व्यापारासाठी विक्री आणि वितरितही करता येणार नाही, असे अमेरिकी अधिका-याने स्पष्ट केले.
जप्तीची टांगती तलवार
जेश इंटरनॅशनलच्या अमेरिकेतील विद्यमान साठ्यावरही आता जप्तीची टांगती तलवार आहे. देशात यापुढे जेशच्या विड्यांची विक्री अथवा वितरण करणा-या कंपनीवर कारवाई होऊ शकते.असे एफडीआयने म्हटले आहे.
माहितीच दिली नाही आता उपलब्ध असलेल्या विड्या पूर्वीप्रमाणेच आहेत की वेगळ्या असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत याची माहिती कंपनीने दिली नाही असे एफडीएने स्पष्ट केले.