आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय तरुणीला दुबईत २० किलो सोन्याचे महाबक्षीस, शॉपिंग फेस्‍टीव्हलमध्‍ये जंगी सोडत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - दुबईत अभियंता म्हणून काम करणा-या २५ वर्षीय भारतीय तरुणीला लकी ड्रॉमध्ये तब्बल २० किलो सोन्याचे महाबक्षीस लागले आहे. या सोन्याची किंमत पाच कोटी रुपये आहे.
मूळ केरळची व केनियात वाढलेली अॅन ही यूएईत स्ट्रक्चरल केबल इंजिनिअर आहे. ७ फेब्रुवारीला अॅनचा मोबाइल खणखणला. मात्र तापेने फणफणल्याने अॅनने तो कट करून सायलेंट केला. मात्र त्या अनोळखी क्रमांकावरून पुन्हा फोन आला. शेवटी वैतागून तिने तो उचलला. दुबई शॉपिंग फेस्टिव्हलच्या जंगी सोडतीत तिला २० किलो सोन्याच्या बक्षीस मिळाल्याची माहिती फोन करणा-याने दिली. त्याची किंमत ३० लाख दिरहॅम (भारतीय चलनात ५ कोटी रुपये) आहे.

केरळातील किलिमला येथील शाळेत शिकलेली अॅन म्हणाली की, आपल्याला २५ व्या वाढदिवशी गिफ्ट म्हणून सोन्याची पैंजण मिळाली होती. मात्र, २० किलो सोन्याच्या बक्षीसाने आपण हरखून गेलो आहोत. एका खास कारणासाठी आयुष्यात कधीतरी लॉटरी लागावी अशी आपली खूप इच्छा होती. केनियात राहणा-या आपल्या वडिलांसाठी स्वप्नातील कार विकत घेण्याची आपली इच्छा होती. आता हे बक्षीस मिळाल्याने पहिली खरेदी तीच राहील, त्या नंतर मात्र जगभ्रमंतीचे स्वप्न पूर्ण करेन. तथापि, आपले पाय जमिनीवरच असून आपण नोकरी सुरू ठेवणार असल्याचे तिने सांगितले. दुबई गोल्ड अँड ज्वेलरी ग्रुपचे महाव्यवस्थापक टॉमी जोसेफ म्हणले की, हे २० किलो सोने अॅनला याच आठवड्यात भेट दिले जाईल.

पुढे वाचा, असे मिळाले बक्षीस