आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Youngsters More Aware Of Politics: Chetan Bhagat

राजकारणाबद्दल भारतीय तरुण जागरूक : चेतन भगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - भारतातील तरुण आता राजकारणाविषयी अधिक जागरूक झाला आहे. त्याला राजकीय पर्यायांची जाणीव असून सत्तेवर येणार्‍या कोणत्याही सरकारला बेजबाबदारपणाची किंमत मोजावी लागेल, असे मत प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी व्यक्त केले आहे.

देशातील मोठा तरुणवर्ग आता सोशल नेटवर्किंगच्या साह्याने राष्ट्रीय राजकारण आणि नेत्यांबद्दलची मते मांडू लागला आहे. त्याचबरोबर विविध राजकीय पर्यायांचीदेखील माहिती घेऊ लागला आहे. या जागरूकतेमुळे नवीन समस्यांना चव्हाट्यावर मांडण्याचे काम केले आहे, असे भगत यांनी म्हटले आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. गेल्या निवडणुकीत भ्रष्टाचार हा मोठा मुद्दा नव्हता. आर्थिक विकासालादेखील अपेक्षित मुद्दा म्हणून मांडण्यात आले नव्हते. ‘2 स्टेट्स ’चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भगत अमेरिकेत आले आहेत.

सोशल मीडिया प्रभावी शस्त्र
देशातील तरुण राजकीय परिवर्तनाच्या प्रक्रियेत व्यग्र झाला आहे. त्यासाठी सोशल मीडिया अतिशय शक्तिशाली शस्त्र म्हणून उपयुक्त ठरले आहे. त्या माध्यमातून युवकांनी आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहे.

बेजबाबदारपणा खपणार नाही
लोकसभा निवडणुकीनंतर कोणतेही सरकार सत्तेवर आले तरी त्याला फार काळ बेजबाबदारपणा दाखवता येणार नाही. तरुणवर्ग अशा बेजबाबदारपणाला खपवून घेणार नाही, असे निरीक्षण भगत यांनी मांडले.