आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Youth News In Marathi, Dollars Saving, Divya Marathi, America

भारतीय तरूणाच्या फंड्यामुळे अमेरिकेची 40 कोटी डॉलर्सची बचत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - केवळ सरकारी दस्तऐवजांचा फाँट बदलून देशाला सुमारे 40 कोटी डॉलर्सची बचत करता येऊ शकते, असा फंडा एका भारतीय वंशाच्या किशोरवयीन मुलाने अमेरिकेला दिला आहे. 14 वर्षीय मुलाची ही योजना प्रगत राष्ट्राच्या बड्या अधिका-यांनाही चकित करणारी ठरली आहे.


सुवीर मिरचंदानी असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पिट्सबर्गच्या विद्यालयात शिक्षण घेतो. विशिष्ट फाँटचा वापर करण्यात आला तर सरकारला फायदा होऊ शकतो, असा दावा त्याने केला आहे. शाळेत अभ्यास करताना कचरा कमी करणे आणि पैशांची बचत करण्यासंबंधीच्या विज्ञानविषयक प्रकल्पात सुवीरला ही कल्पना सुचली. कागदाच्या फेरवापरातून पैशाची बचत केली जाऊ शकते. दुसरा मार्ग म्हणून शाईच्या कमीत कमी वापरातूनदेखील मोठ्या प्रमाणात बचत केली जाऊ शकते, असे सुवीरच्या लक्षात आले.


शाईवरील खर्च असा वाचेल
सध्या अमेरिका सरकारी कागदपत्रांच्या छपाईच्या शाईवर दरवर्षी सुमारे 46 कोटी डॉलर्सचा खर्च करते. परंतु फेडरलने गारामाँड नावाचा फाँट सरकारी दस्तऐवजांच्या मुद्रणासाठी वापरल्यास किमान 30 टक्के खर्चात बचत होऊ शकते. गारामाँड फाँटसाठी दरवर्षी 13 कोटी एवढा खर्च येईल, असे सुवीरचे म्हणणे आहे.


1.8 अब्ज डॉलर अमेरिकेचा मुद्रणावरील
वार्षिक खर्च 46 कोटी डॉलर मुद्रणाच्या शाईवरील खर्च


फ्रेंच पर्फ्युमपेक्षा महागडी
फेडरल सरकारच्या कारभारात वापरली जाणारी शाई फ्रेंच पर्फ्युमपेक्षा दुप्पट महाग असल्याचे लक्षात आल्यानंतर मी शाईवरील खर्च कसा कमी करता येईल, यासंबंधी विचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मला काही गोष्टी आढळून आल्या. त्यात पैशाच्या बचतीचा मार्ग दिसून आला.


कसा केला अभ्यास
सुवीरने सरकारच्या शाईवरील खर्च वाचवण्यासाठी अतिशय सखोल अभ्यास केला. ई, टी, ए, ओ आणि आर या इंग्रजी मुळाक्षरांचा सामान्यपणे अधिक वापर केला जातो. त्या प्रत्येक अक्षरांसाठी सुवीरने वेगवेगळी शाई वापरून पाहिली. गारामाँड, टाइम्स न्यू रोमन, सेंच्युरी गॉथिक, कॉमिकसॅन्स यावर शाई वापरून पाहण्यात आली. त्यानंतर शाईचा किती वापर झाला याचे मूल्यमापन करण्यात आले.