आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indians In Leicester: Unwelcome In 1972; Hailed In 2012 ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नकोशा भारतीयांनी घडवले लिसेस्टर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - प्रतिकूल परिस्थितीमुळे दक्षिण आफ्रिकेतील युगांडामधून बाहेर पडलेल्या निर्वासित भारतीय नागरिकांना इंग्लंडमधील लिसेस्टरमध्ये येण्यास विरोध होता, परंतु नंतर स्थायिक झाल्यावर या नकोशा भारतीयांनी शहराचा नकाशा चाळीस वर्षांत बदलून टाकला. 1972 मध्ये दाखल झालेले सुमारे 10 हजार नागरिक लिसेस्टरच्या विकासाचे शिल्पकार ठरले.
युगांडामधील इदी अमीन यांच्या हुकूमशाहीतून बाहेर पडलेल्या भारतीयांनी इंग्लंडची वाट धरली होती, परंतु इंग्लंडमध्ये त्यांचे स्वागत होणार नाही, असे त्यांना वाटलेही नसावे. 1972 मध्ये हजारो निर्वासित भारतीय लिसेस्टर शहरात दाखल झाले. मात्र त्यांना विरोध करण्यासाठी इंग्लंडच्या प्रशासनाने जाहिरातीचा वापर केला. तुमचे व तुमच्या कुुटुंबाच्या हिताचा विचार करा, म्हणूनच तुमचे लिसेस्टरमध्ये स्वागत नाही. अशा आशयाच्या जाहिराती शहरात लागल्या होत्या. त्यानंतर चाळीस वर्षे भारतीयांसाठी या शहरात फार वेगळी परिस्थिती राहिली नाही. तरीही भारतीय नागरिकांनी चिकाटीने वर्षानुवर्षे आपला व्यवसाय व काम कष्टपूर्वक केले. त्याचा परिणाम म्हणून शहर आजच्या घडीला भरभराटीला लागले आहे. समृध्द झाले आहे. युगांडामधून इंग्लंडमध्ये दाखल झालेले अनेक भारतीय सुशिक्षित आहेत. त्यांच्या परिश्रमातूनच लिसेस्टरचा चेहरामोहरा बदलला आहे. हे भारतीय बहुतांश मूळचे गुजराती आहेत. हुकूमशहा अमीनने भारतीयांना देश सोडण्यासाठी 90 दिवसांची मुदत दिली होती. आपली घरे व संपत्ती तशीच सोडून बाहेर पडण्याची वेळ भारतीयांवर आली होती. त्यांच्याजवळ केवळ सुमारे 4 हजार 7 रुपये एवढीच रोख रक्कम राहिली होती. याच स्थितीत भारतीय युगांडामधून निर्वासित झाले होते. पूर्वी नकोसे असलेले भारतीय त्याच शहरात मोठ्या हुद्द्यावर जबाबदारी सांभाळताना दिसतात. ज्या प्रशासनाने त्यांना शहरात येऊ नये, असे म्हटले होते. त्याच प्रशासनाच्या यशात आज भारतीयांचा सिंहाचा वाटा आहे. मूळचे गोव्यातील केथ वाझ सध्या पूर्व लिसेस्टर मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आहेत. ‘बेंड इट लाइक बेकहॅम’ मधील स्टार परमिंदर नागरा लिसेस्टरच्याच आहेत. लुधियानामधील मंजुळा सूद यांना 2008 मध्ये लॉर्ड मेयर उपाधी मिळाली होती. हे मानाचे पद 800 वर्षांत पहिल्यांदाच एक आशियायी व्यक्तीला मिळाले होते .
महाराणीची उपस्थिती - लिसेस्टरचे स्थान आता इंग्लंडमध्ये उच्च पातळीवर गेले आहे. भारतीयांना सुरुवातीला विरोध करणा-या या शहराचा आजचा चेहरा बहुसांस्कृतिक महानगर असा आहे. म्हणूनच शहराची कीर्ती ऐकून महाराणी एलिझाबेथ यांनी राज्याभिषेकाच्या हीरक महोत्सवी काळात लिसेस्टरला आवर्जून भेट दिली होती. त्यावेळी बॉलीवूड गीत-संगीताने त्यांचे शानदार स्वागत करण्यात आले होते.