आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधावत्या जगात आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांगाला भस्म फासून वैराग्य पत्करलेल्या तसेच सर्व भौतिक सुखाचा त्याग करून एखादा व्यक्ती साधूचे आयुष्य का जगत असावा? याचा अंदाज लावणे अवघड आहे. संसाराच्या मायामोहात न अडकून राहता धाडसी निर्णय घेणारे भारतात अनेक साधू आहेत. समाजात राहणारा प्राणी म्हणून माणसाची ओळख आहे. मात्र, या समाजापासून दूर कुठेतरी जंगलात आपले आयुष्य साधनेमध्ये आणि ईश्वराच्या शोधात का घालवतो, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी न्यूयॉर्कच्या ब्रूकलिन नगरचा फोटोग्राफर जॉय एल पुट्स यांनी जगभरातील साधूंचा शोध घेऊन त्यांच्या भेटी घेतल्या.
आध्यात्मिक मुक्ती मिळवण्यासाठी संसाराचा त्याग करणा-या अनेक साधूंचा शोध घेण्याचे फोटोग्राफर जॉय एल पुट्स काम सुरूच आहे.
भिक्षू आणि साधूंच्या शोधात निघालेल्या या फोटोग्राफरने उत्तर इथोपीयापासून सुरूवात केली. अनेक देशाची यात्रा करून जॉय हे भारतात पोहोचले. जॉय यांनी वाराणसीमध्ये अनेक साधू-संतांची भेट घेतली.
वाराणसीमधील अनेक साधूंची तपश्चर्या करतानाची अनेक छायाचित्रे जॉय यांनी घेतले. यामध्ये अघोरी बाबा म्हणून ओळखल्या जाणा-या साधूचे जास्त छायाचित्रे जॉय यांनी काढली आहेत. प्रेताची राख सर्वांगाला लावणारे बाबा म्हणून या अघोरी बाबांची ओळख आहे. भारतामध्ये आलेल्या जॉय यांच्यासोबत आलेले फिल्म मेकर केल ग्लेडिंग यांनी या साधू-संतावर एक माहितीपट बनवला आहे.
पुढील स्लाईडवर पाहा जॉय यांच्या कॅमे-याने टिपलेले साधूंचे छायाचित्रे....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.