काबूल - अफगाणिस्तान सरकारने राजधानी काबूलच्या मध्य वस्तीत एक विशाल ध्वजा रोवली आहे. हा ध्वज म्हणजे भारत - अफगाणिस्तान मैत्रीचे प्रतीक ठरत आहे. काळा, लाल आणि हिरव्या रंगातील हा झेंडा ९७ फूट लांब आणि ६५ फूट रुंद आहे. हा ध्वज लासवेगास येथील न्यायदेवतेच्या प्रतिकृतीपेक्षाही उंच आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तान दौऱ्यात तेथील राष्ट्रपती हामदि करझई यांना तो भेट म्हणून दिला होता. काबूलमधील ऐतिहासिक वझीर अकबर खान टेकडीवर हा ध्वज फडकवण्यात आला आहे.