आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशियात 7.3 रिश्टर तीव्रतेचा भूकंप; सुनामीचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता - इंडोनेशियामध्ये 7.3 रिश्टर तीव्रतेच्या भूकापानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाचे केंद्र इंडोनेशियाच्या पूर्व भागातील मोलुक्का समुद्रात होते.

पॅसिफिक सुनामी सूचना केंद्रानुसार भूकंप केंद्राच्या 300 किलोमीटर परिसरात एक मीटर उंचीच्या लाटा निर्माण होऊ शकतात.

युएस जियोलॉजिकल सर्व्हेनुसार, हा भूकंप मोलुक्का द्वीप (आयर्लंड)च्या टेर्नेट शहराच्या उत्तर-पश्चिम दिशेला जमिनीत 46 किलोमीटर खाली आला होता.

सूचना केंद्रानुसार, भूकंपामुळे निर्माण होणार्‍या सुनामीचा धोका इंडोनेशिया व्यतिरिक्त फिलिपिन्स, पलायी, पपुआ न्यू गिनी, सोलोमन आयर्लंड, जपान आणि तैवान या देशानांही सहन करावा लागू शकतो. पुढील सहा तासात सुनामी इंडोनेशियाच्या समुद्र किनार्‍यावर पोहचू शकते.