आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विचित्र फर्मानः इंडोनेशियामध्‍ये तपासणार 15-16 वर्षांच्‍या मुलींचे कौमार्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता- महिलांवर होणारे अत्‍याचार आणि तालिबानी फतव्‍यांविरुद्ध जगभरात ओरड होत असताना इंडोनेशियाने असाचक एक विचित्र निर्णय घेतला आहे. इंडोनेशियातील 15-16 वर्षांच्‍या मुलींना शुद्धतेचे प्रमाण द्यावे लागणार असून त्‍यांना अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. अर्थात त्‍यांना कौमार्य शाबूत असल्‍याचे सिद्ध करावे लागणार आहे.

इंडो‍नेशियातील प्रभुमुली जिल्‍ह्यात प्रशासनाने हा विचित्र निर्णय घेतला आहे. शिक्षणाधिकारी एच. एम. रशीद यांनी हे फर्मान सोडले असून हा निर्णय मुलींच्‍याच हिताचा असल्‍याचा दावा त्‍यांनी केला आहे. मुलींचे कशाप्रकारे हित होणार आहे, हे मात्र त्‍यांनी सांगितले नाही.