आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indonesia Volcano Erupts Again; Kills At Least 14

ज्वालामुखीच्या तप्त राखेने इंडोनेशिया उडवला हाहाकार; पाहा छायाचित्रे..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारो- इंडोनेशियातील माउंट सिनाबंग भागात ज्वालामुखीचा स्फोट झाल्याने हाहाकार माजला आहे. ज्वालामुखीमुळे मोठ्याप्रमाणात तप्त राख बाहेर आली आहे. तप्त राखेत होरपळून 14 जणांना मृत्यु झाला आहे. मृतांमध्ये एका शाळेतील चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शेकडो नागरिक जखमी झाले आहेत.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रवक्ता सुतोपो पूर्वों नुगरोहो म्हणाले, ज्वालामुखीची तप्त राख जवळपास दोन हजार मीटर परिसरात पसरली आहे. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. रस्त्यावरच काय तर घरांमध्येही ही तप्त राख पसरल्यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे.

पुढील स्लाइड्‍समध्ये पाहा, ज्वालामुखी स्फोटानंतर निर्माण झालेली परिस्थिती...