आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारावरील ‘विनोद’ न्यायाधीशांना पडला महाग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता - बलात्कार पीडिताने तो एन्जॉय केला असेल, असे वक्तव्य भरन्यायालयात करणार्‍या एका न्यायाधीश महाशयांना त्यांच्या कथित विनोदबुद्धीने चांगलेच अडचणीत आणले आहे. एका बलात्काराच्या खटल्यात न्यायाधीश महाशयांनी हे भाष्य केले. त्यांच्या जोकवर उपस्थितांमध्ये हशा पिकेल असे त्यांना वाटले, परंतु न्यायदानाच्या आसनावर बसून असे भाष्य केल्याबद्दल त्यांना न्याय आयोगाच्या समोर उभे राहावे लागले. ही घटना शुक्रवारी घडली. हा आयोग न्यायाधीशांच्या आचारसंहितेची कडकपणे अंमलबजावणी करण्याचे काम करतो. हे वक्तव्य अशोभनीय आहे. गेल्या आठवड्यात त्यांची आयोगाकडून कसून चौकशी करण्यात आली. आयोगाने त्यांची पदावरून हकालपट्टी करण्याचे आदेश बजावले आहेत. न्यायाधीशाला आता आचारसंहिता लवादासमोर हजर व्हावे लागणार आहे.