(अॅमेझॉनचे वेअरहाऊस )
अॅमेझॉन भारतात
आपला व्यवसाय वाढवण्यासाठी दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे. फ्लिपकार्टने देशात एक अब्ज डॉलर गुंतवणूकीची घोषणेनंतर अॅमेझॉनने दुप्पट गुंतवणूकीची घोषणा केली. अॅमेझॉन भारतात चार वेअरहाऊस उभारणार आहे. कंपनीची भारतात इतर ई-व्यापार कंपन्यांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक आहे.
कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस भारतातील ई-व्यापाराच्या विकासाबाबत उत्साहित आणि आशावादी आहेत.भारतातील ऑनलाइन व्यवसायाचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. येणा-या काळात देशाची बाजारपेठ आम्ही काबीज करणार आहोत. अॅमेझॉनने भारतात प्रवेश केल्यापासून आम्हाला ग्राहकाभिमुख कंपनी बनायचे आहे, असे भारतातील अॅमेझॉन इंडिया चे प्रमुख अमित अग्रवाल यांनी सांगितले. पुढील छायाचित्रांमधून आम्ही अॅमेझॉनच्या वेअरहाऊसच्या माध्यमातून तेथे सुरु असलेल्या कार्यसंस्कृती दाखवणार आहे.
पुढे पाहा...अॅमेझॉनचे फीनिक्स येथील वेअरहाऊसमधील कार्यसंस्कृतीचे छायाचित्रे...