आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Brisbane Hotels Worlds Leaders Stay During G 20 Summit

PICS: ऑस्ट्रेलियाच्या या हॉटेल्समध्‍ये मोदींसह जगातील 20 नेते थांबणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियामध्‍ये या आठवड्याच्या शेवटी जी-20 देशांची परिषद होत आहे. ब्रिस्बेन शहराकडे याचे यजमानपद आहे. परिषदेसाठी जगभरातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. राहण्‍यासाठी प्रत्येक नेत्याने खास व्यवस्था केली आहे. अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा सर्वात महागड्या सुटमध्‍ये थांबणार, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबोट यांनी सर्वात स्वस्त हॉटेल बुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचतारांकित ब्रिस्बेन सेंट्रल हॉटेलमध्‍ये थांबणार आहेत. त्याचे एका रात्रीचे भाडे 35 हजारापासून सुरु होते.

ओबामासाठी ब्रिस्बेनच्या मेरिएट हॉटेलमध्‍ये एका रात्री करिता 14 लाख प्रेझिडेन्शियल सुट बुक करण्‍यात आले आहे. येथून ब्रिस्बेन नदीचे सुंदर दृश्‍य दिसते. या 28 मजली हॉटेलमध्‍ये एकूण 263 रुम्स असून फक्त चार सुट आहेत.अमेरिकेच्या संरक्षण अधिका-यांनी राष्‍ट्राध्‍यक्षांचे थांबण्‍याचे स्थळ केव्हाच आपल्या ताब्यात घेतले आहे. लक्झरीच्याबाबतीत चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष श‍ी जिनपिंग मागे नाही. ते स्टॅमफोर्ड प्लाझा हॉटेलच्या स्टॅमफोर्ड सुटमध्‍ये थांबणार आहेत. त्याचे एका रात्रीचे भाडे 90 हजारापेक्षा जास्त आहे. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन ट्रेझरी हॉटेलच्या सुटमध्‍ये मुक्काम करणार आहेत. येथे एका रात्रीचे भाडे 70 हजार इतके आहे.
सर्वात महागडा सुट बुक करण्‍यात म्यानमारचे राष्‍ट्राध्‍यक्ष थिएन शिन्वात्र यांनी रशियाचे पुतीन आणि सौदी अरेब‍ियाचे राजे अब्दुल्ला यांना मागे टाकले आहे. इतर देशांच्या प्रमुखांमध्‍ये अँजेला मॉर्केल मोडेस्ट फॉर पॉईंटमध्‍ये थांबणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि फ्रेन्च राष्‍ट्राध्‍यक्ष ओलांद एकाच हॉटेलमध्‍ये मुक्काम आहे.

पुढे पाहा हॉटेल्सची छायाचित्रे... जिथे जगभरातील प्रमुख नेता थांबणार आहेत..