आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Inside Photos Of White House News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Inside White House: हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली नेत्याचे घर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्हाइट हाउसच्या ट्रीटी रूममध्ये ओबामा त्यांच्या कुटुंबासमवेत)
इंटरनेशनल डेस्क - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी पाच दिवसीय अमेरिका दौर्‍यासाठी भारतातून रवाना झाले. या दौर्‍यामध्ये मोदी संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण करणार आहेत. तसेच अनेक कार्यक्रमातही ते सहभाग नोंदवतील. अमेरिकेत मोदींच्या स्वागतासाठी जोरात तयारी सुरू आहे. 29 सप्टेंबरला मोदी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची भेट घेणार असून ते व्हाईट हाऊसमध्ये ओबामांचे पाहूणे असणार आहेत.
जाणून घ्या व्हाईट हाऊसबद्दल...

व्हाईट हाऊची निर्मिती 1792 आणि 1800 च्या दरम्यान झाली होती. याचे डिझाईन आररिश आर्किटेक्स जेम्स होबान यांनी बनवले होते. 1801 मध्ये थॉमसन जेफरसन हे व्हाईट हाऊसमध्ये आल्यानंतर याचा विस्तार करण्यात आला. 1814 मध्ये युध्दादरम्यान ब्रिटीश सैन्याने व्हाईट हाऊसला आग लावली होती. त्यानंतर 1815 ते 1817 पर्यंत याचे रिनोव्हेशन करण्यात आले. यावेळी आर्किटेक्ट हेनरी यांच्यासोबत मिळून होबान यांनी याचे पुन्हा डिझाईन तयार केले.
सध्या व्हाईट हाऊस इमारतीमध्ये एक्झिकेटीव्ह रेसि़डेन्स, वेस्ट विंग, इस्ट विंग आणि इसेनहाऊर एक्झिकेटीव्ह ऑफिस बिल्डिंग आहे. इसेन हाऊर एक्सिकेटीव्ह ऑफिस राष्ट्रपतींच्या स्टाफ आणि उपराष्ट्रपती यांच्यासाठी आहे. तसेच पाहूण्यांच्या राहण्यासाठी ब्लेअर हाऊससुध्दा आहे. व्हाईट हाऊसचे एक्झिकेटीव्ह रेसिडेंस सहा मजल्याचे आहे. ज्यातील दोन मजले हे बेसमेंटमध्ये आहेत, तर इतर चार मजले वरच्या बाजूस आहेत.
पुढे पाहा, अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनातील म्हणजेच व्हाईट हाऊसची आतापर्यंत न पाहिलेले फोटो...