आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Peshawar मुलांचे बेंच, बॅगच्या जागा, आर्मी स्कूलमध्ये सगळीकडे रक्तच रक्त, पाहा PIC\'s

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - येथील आर्मी स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. तहरीक-ए-तालिबानच्या सात दहशतवाद्यांनी सात तास केलेल्या या क्रौर्याने बालकांचे प्राण हिरावून घेतले. त्यामुळे देशातील प्रत्येकाच्या मनात दहशतवाद्यांसाठीचा राग धुमसत आहे.
तालिबानबरोबर शांतता चर्चा करण्याच्या आश्वासनावर सत्तेत आलेले शरीफ सराकार केव्हापर्यंत शांत राहणार याचेच उत्तर प्रत्येकजण मागत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या घटनेच्या पार्श्भूमीवर एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यात देशातील सर्व पक्षांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.

दरम्यान, शाळेतील आणि परिसराचे काही ताजे फोटो समोर आले आहेत. ते पाहून त्या दिवशी घडलेल्या त्या भयंकर घटनेचा अंदाज लावता येऊ शकतो. शाळेचे वर्ग आणि ऑडिटोरियममध्ये सगळीकडे रक्तच रक्त पसरलेले आहे. डेस्कवर पडलेल्या मोकळ्या पुस्तकांवरही मोठ्या प्रमाणावर रक्त पडलेले दिसून येते आहे.
पुढील स्लाइड्वर पाहा आर्मी स्कूलच्या आतील PHOTO