आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाझापट्टीवर आजही हमास दहशतवाद्यांचे भूयारी मार्ग जैसे थे, पाहा समोर आलेले PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्रायलने प्रोटेक्टिव्ह एज ऑपरेशन अंतर्गत गाझापट्टीवर सर्वच भूयारी मार्ग नष्‍ट केल्याची घोषणा केली. एका वृत्तसंस्थेचा पत्रकार आणि कॅमरामनने ग्राऊंड रिअॅलिटी कैद केली आहे. याबाबत इस्रायल अनभिज्ञ आहे. अर्थात आताही गाझापट्टीवर हमासची अनेक भूयारी मार्ग सुरक्षित आहेत. येथे छायाचित्रामध्‍ये तुम्हाला भूयारी मार्गावर दहशतवादी दिसत आहेत. आम्ही त्या भूयारी मार्गावर उभे राहून बोलत आहोत, जो इस्रायलने नष्‍ट केल्याचा दावा केला होता. आमचे लोक या मार्गातूनच सर्व कारवाया करत आहेत, असे एका दहशतवाद्यांने वृत्तसंस्थेच्या पत्रकारला सांगितले.
दहशतवाद्याने संबंधित पत्रकाराला भूयारी मार्गावर फ‍िरवून आणले. तत्पूर्वी त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्‍यात आले होते. रस्ते इतके वर्तुळाकार होते की इस्रायलच्या हल्ल्यात किती गुप्त मार्ग जशीची तशी आहेत, अशी शंका मनात येते, असे त्या पत्रकाराने सांगितले. गाझापट्टीवरील भूयारी मार्ग आम्हाला घरची अनुभूती देते, असे हमासच्या एका कमांडरने सांगितले. त्याची निर्मिती घराप्रमाणे करण्‍यात आली आहे.
गाझापट्टीवरील या भूयारी मार्गाची एक अंडरग्राऊंड अर्थव्यवस्था चालते. हमास त्यांचा वापर तस्करीसाठी करत आहे. या मार्गांचे नेटवर्क इजिप्तला जोडण्‍यात आली आहे. हमासची ही भूयार मार्ग नेहमी इस्रायलच्या रडारवर राहिलेली आहेत. यातून दहशतवादी शस्त्रास्त्रांची तस्करी करतात . याच कारणामुळे इस्रायलने 8 जुलैपासून ती नष्‍ट करण्‍यासाठी' प्रोटेक्टिव्ह एज' नावाचे लष्‍करी कारवाई सुरु केली आहे.

पुढील छायाचित्रांमधून पाहा हमासचे दहशतवादी कशा पध्‍दतीने भूयारी मार्गांचा वापर करते...