आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Instant Noodles Solution On World Hunger Problem

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील भुकेचा प्रश्‍न मिटवण्‍यासाठी इन्स्टंट नूडल्सचा उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - जगात कोणीही उपाशीपोटी झोपू नये यासाठी विविध सरकारे, तज्ज्ञ लक्ष घालत असतानाच भुकेचा प्रश्न मिटवण्यासाठी इन्स्टंट नूडल्स त्यावर उत्तर उपाय असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.


जगात अतिशय खडतर परिस्थितीत राहणा-या लोकांना इन्स्टंट नूडल्समार्फत पुरेसे अन्न मिळू शकते, असे अमेरिकेतील अ‍ॅमहरेस्ट कॉलेजमधील अर्थोपोलॉजीचे प्रो. देबोराह गेवर्त्झ यांनी सांगितले. गेवर्त्झ व अन्य दोन लेखकांच्या नव्या पुस्तकात नूडल्सचा इतिहास, उत्पादन, विपणन व त्याच्या वापरावर प्रकाश टाकला आहे. यामध्ये येत्या काही वर्षांत लोकांच्या पोटाची गरज भागवण्यासाठी नूडल्स महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकते, असा दावा करण्यात आला आहे. विविध जीवनशैली अंगीकारणा-या लोकांना नूडल्सचा सारखाच फायदा होतो, असे गेवर्त्झ म्हणाल्या. झटपट तयार होणारे चविष्ट, स्वस्त नूडल्सचे महत्त्व भविष्यातही कायम राहील.


जागतिक लोकसंख्येसाठी नूडल्स हा उत्तम खाद्यपदार्थाचा पर्याय ठरावा यासाठी संशोधकांनी नूडल्स उत्पादक कंपन्यांना काही सूचना केल्या आहेत. यामध्ये नूडल्स भाजून खाण्यायोग्य बनवणे तसेच मीठ व मोनोसोडियम ग्लुटामेटऐवजी (एमएसजी) मसाल्याचा वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे. 2050 पर्यंत शहरात वास्तव्य करणा-या 9 अब्ज लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी अन्नपदार्थाचे औद्योगिक स्तरावर उत्पादन होणे आवश्यक असल्याचे गेवर्त्झ म्हणाल्या.


गरीब आधुनिक खाद्यपदार्थाचा ग्राहक
पुस्तकामध्ये चवीशी संबंधित माणसाच्या जैवमानसशास्त्राबद्दल माहिती देण्यात आली असून भविष्यामध्ये कोट्यवधी लोकांच्या आहारात नूडल्सला स्थान असेल, असे सांगण्यात आले आहे. इन्स्टंट नूडल्सचा प्रसार सुरूच राहील. त्यामुळे त्याच्या उत्पादनावर तेवढ्याच जागरूकतेने लक्ष देणे आवश्यक आहे. इन्स्टंट नूडल्सच्या वापरामुळे गरीब वर्ग आधुनिक खाद्यपदार्थाच्या ग्राहकात रूपांतरित होत आहे, असे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले.


जपानमध्ये उरल्यासुरल्या अन्नाचा मेनू प्रसिद्ध
जपानच्या घराघरात स्वयंपाकातील उरल्यासुरल्या अन्नाचा खाद्यपदार्थ लोकप्रिय होत आहे. यामुळे वाया जाणारे अन्न कारणी लागून स्वयंपाकाचा वेळही वाचत आहे. खाद्यपदार्थ उत्पादक कंपन्या या रेसिपीची प्रसिद्धी बेवसाइट्सवर व टीव्ही चॅनलवर करत आहेत. मुळा व मीठ लावलेल्या काकडीच्या सलादला कूकपॅड या रेसिपी वेबसाइटवर मोठा प्रतिसाद मिळत आहे, असे खाद्यपदार्थ उत्पादक कंपनीतील कर्मचारी योको कुबोता यांनी सांगितले.