आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International Affairs : Three Christan Women Nuded In Pakistan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंतरराष्‍ट्रीय घडामोड: पाकिस्तानात तीन ख्रिश्चन महिलांची विवस्त्र धिंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - पाकिस्तानातील एका धनदांडग्याने शस्त्रधारी गुंडांच्या मदतीने तीन अल्पसंख्याक ख्रिश्चन महिलांना बेदम मारहाण केली. त्यानंतर या महिलांना विवस्त्र करून गावातून धिंडही काढण्यात आल्याचे प्रकरण उजेडात आले आहे.
मानवतेला काळिमा फासणारी ही घटना पंजाब प्रांतात एक महिन्यापूर्वी घडली आहे. या प्रकरणी शुक्रवारी लाहोर उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या प्रकरणात दोन आठवड्यात अहवाल देण्यास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मोहंमद मुनीर असे दांडगाई करणा-या जमीनदाराचे नाव आहे. पैशांच्या जोरावर मुनीरचा पंचक्रोशीत चांगलाच दबदबा आहे. त्याच जोरावर त्याने तीन ख्रिश्चन महिलांना आपल्या चार गुंडांकडून अमानुष मारहाण केली. अगोदर मुनीर सादिक मसिह यांच्या घरात घुसला. त्याने मसिहला शोधले, परंतु तो व त्याची तीन मुले कामावर गेलेली होती. म्हणून संतापलेल्या मुनीरने सादिकच्या तीन सुनांना ओढत-फरफटत बाहेर आणले. त्यानंतर त्यांना गावात विवस्त्र करून फिरवण्यात आले. असहाय महिला मदतीसाठी पुकारा करत होत्या, परंतु त्यांचा टाहो ऐकून सुरुवातीला कोणीही मदतीला आले नाही, परंतु नंतर काही बुजुर्ग मंडळी पुढे आली व त्यांनी गुंडांच्या तावडीतून या महिलांची सुटका केली. घटनेची वाच्यता पोलिसांकडे केल्यास गय केली जाणार नाही, अशी धमकीही मुनीरने दिली होती. त्यामुळे अनेक दिवस ही घटना चव्हाट्यावर आली नाही. मसिहची मुले व मुनीर यांच्यात पाळीव प्राण्यांवरून काहीतरी वाद उद्भवला होता. त्याचा सूड घेण्यासाठी त्याने मसिहच्या घरावर चाल केल्याचे सांगण्यात आले. ही घटना जूनच्या पहिल्या आठवड्यात लाहोरपासून 50 किलोमीटर अंतरावरील कासूर जिल्ह्यातील पट्टोकी गावात घडली. एशियन ह्युमन राइट्स कमिशनने (एएचआरसी) काही दिवसांपूर्वी हे प्रकरण उजेडात आणले.