दोन देशांमध्ये सीमा वाद हा फार प्रमुख प्रश्न असतो. भारत-पाकिस्तान असो, भारत-चीन असो किंवा तिबेट-चीन असो. सीमा वादामुळे दोन्ही देशांचे संबंध ताणले जातात. जगभरातील अनेक देश या वादांचा सामना करतात. पण काही देशांमध्ये सीमेवर अगदी शांतता असते. तेथे गेल्यावर ती दोन देशांमधील सीमा असल्याचे जाणवतसुद्धा नाही.
बेल्जिअम-नेदरलॅंड सीमेवर असलेली इमारत
बेल्जियमच्या बार्ले-नस्सो आणि नेदरलॅंडच्या बार्ले-हेर्टोग सीमेवर ही इमारत आहे. विशेष म्हणजे या इमारतीचे दोन पत्ते आहेत. एक दार असले तरी दोन डोअरबेल आहेत. एक बेल एका देशात तर दुसरी दुसऱ्या देशात आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, पाच अशाच आंतरराष्ट्रीय सीमेसंदर्भात...