आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Media Coverage On Narendra Modi Admits He Is Married

\'63च्या वयात बॅचलर मोदींना मिळाली पत्नी\'; विदेशी मीडियाने उडविली खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा विवाहीत असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर कडाडून टीका सुरु केली आहे. 46 वर्षांपासून आपल्या पत्नीला न्याय देऊ शकला नाही ती व्यक्ती देशातील जनतेला काय न्याय देणार? असा सवालही कॉग्रेसने उपस्थित केला आहे.

दुसरीकडे, विदेशी मीडियात नरेंद्र मोदी विवाहीत असल्याचा खुलासा प्रामुख्याने प्रसिद्ध करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बहुतांशी विदेशी वृत्तपत्रांत मोदींची खिल्ली उडविण्यात आली आहे. 63 व्या वर्षी बॅचलर मोदींना मिळाली पत्नी असे वृत्त प्रसिद्ध करून मोदींवर टिप्पणी करण्यात आली आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बडोद्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रथमच त्यांच्या वैवाहिक जीवनाबाबतची माहिती दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीत भरलेल्या प्रतिज्ञापत्रात मोदींनी अशी कोणतीही माहिती दिली नसल्याने या मुद्द्यावरून विरोधकांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींवर टीका करण्यासाठी आयते कोलीत सापडले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून, वाचा विदेशी मीडिया Reports....