आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी मीडियाचा कौल नरेंद्र मोदींच्या बाजुने; वाचा इंटरनॅशनल कव्हरेज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 16 व्या लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यात आसाम आणि ‍त्रिपुरामध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाने जनतेसमोर जाहीरनामा सादर केला असून त्यात राम मंदिराचा उल्लेख करण्यात आला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिर उभारले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे जाहीरनाम्यात राम मंदिराचा उल्लेख नसावा, असा आग्रह भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा होता. तरीही हा मुद्दा जाहीरनाम्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


दरम्यान, भारतात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांवर विदेशी मीडिया बारीक लक्ष ठेवून आले. गेल्या दशकात आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या भारताची ताकद वाढली आहे. एक मोठी बाजारपेठ असताना येत्या दशकात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था मानली जाणार आहे. भारतीय राजकारणात होणार्‍या बदलांचा थेट जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. विशेष म्हणजे परिवर्तनासोबत सरकारी धोरणे देखील बदलतात. विदेशी मीडियाने नरेंद्र मोदींच्या बाजुने कौल दिला आहे. नरेंद्र मोदी विजयी होतील, अशी शक्यताही बहुतेक विदेशी वृत्तपत्र निवडणूक सर्व्हेक्षणाने वर्तवली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, या बातम्यांना दिले विदेशी मीडियाने प्राधान्य...