आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या 33 टक्के भूप्रदेशात पाणीच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही गोष्ट आश्चर्य वाटण्याजोगी पण सत्य आहे. अमेरिकेतील जमीन 33 टक्क्यांहून अधिक प्रमाणात सुकलेली आहे. तेथील बहुतांश बंधारे कोरडे आहेत किंवा नद्यांतूनही पाणी वाहत नाही. अमेरिकेतील काही प्रदेश एकदम कोरडे असून दुष्काळ वाढतच चालला आहे. नासाने बर्‍याच प्रयत्नांनंतर भूमिगत पाण्यासाठी एक नकाशा तयार करण्यात यश मिळवले असून प्राप्त अहवालानुसार 33.5 टक्के जमिनीत पाणीच शिल्लक नाही. टेक्सास आणि ओक्लाहामासारख्या राज्यांत परिस्थिती चांगली आहे, परंतु नेवादा आणि कॅलिफोर्नियामध्ये दुष्काळ आहे. कॅलिफोर्नियातील 83 टक्के जमीन कोरडवाहू बनली आहे. पश्चिम अमेरिकेत अशी स्थिती निर्माण होण्यास पावसाचे कमी झालेले प्रमाण कारणीभूत आहे. नासाने सॅटेलाइट फोटोग्राफी आणि ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड क्लायमेट एक्सपेरिमेंट (ग्रेस) सॅटेलाइटच्या मदतीने दुष्काळ निवारणाचे प्रयत्न करणार्‍या संस्थेला हा नकाशा सादर केला. ग्रेस आभाळात मोजमापाचे काम करतो. अमेरिकेच्या जमिनीत सर्वाधिक पाणी कोलॅरॅडो नदीच्या पात्रात आहे. ग्रेसशी संबंधित वैज्ञानिकांनी आश्चर्यजनक कारण सांगितले. 2004 नंतर या पात्रासाठी 5 कोटी 30 लाख एकर क्षेत्रातील पाणी संपले आहे. कोलॅरॅडोची प्रमुख नदी मिडचा पाणीसाठा सध्या अत्यंत खालावला आहे.