आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International News In Marathi, America, Divya Marathi

आईशी फोनवर बोलता बोलता ती पर्वतावरून घसरली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँकरेज (अमेरिका)- मित्र-मैत्रिणींसोबत ती अलास्कातील पर्वतरांगांवर गिर्यारोहणासाठी गेली. फॉक्स शिखरावर पोहोचल्यानंतर तिने आईला फोन लावला. दोघी मायलेकी 15 मिनिटे बोलत होत्या. ‘आई, डोंगर खूप निसरडा आहे, मला भीती वाटतेय...’ अचानक आईला किंकाळी ऐकू आली. नंतर एकदम शांतता. ती तरुणी शिखरावरून 30 फूट घसरली. नशीब बलवत्तर म्हणून वाचली. अमेरिकेच्या अलास्कामधील हे थरारनाट्य. त्याची ही कहाणी.

18 वर्षांची शेरील लॅग्रोरू मित्र-मैत्रिणींसोबत अलास्का येथे डेनाली प्रिन्सेस वाइल्डरनेस लॉज येथे कामासाठी गेली होती. अलास्कातील शिखरे तिला साद घालत होती. तिला एकटीनेच फॉक्स शिखर गाठायचे होते. रविवारी तिने शिखरावर चढाई सुरू केली. तिला तेथील धबधबा पाहायचा होता. शिखरावर चढल्यानंतर पुढे तिला सुचेनासे झाले. तिने 2400 कि.मी. दूरवर वॉशिंग्टनला असलेल्या आईला फोन केला. दोघी फोनवर 15 मिनिटे बोलत होत्या. ‘आई, डोंगर खूप निसरडा आहे, काय करू?’ आईने सल्ला दिला, ‘फोनचा हेडसेट कानाला लाव. धीर धर.’

शिखरावरून घसरूनही तरुणीचे प्राण वाचले, अमेरिकेत 45 मिनिटांचे थरारनाट्य

अचानक भयाण शांतता
आईने सल्ला देताच तिने हेडसेट लावला. ती रडायला लागली. आई, मला मरायचं नाही. बोलता बोलता तिचा पाय घसरला. ती थेट 30 फूट खाली घसरली. जोरदार किंकाळी. पुढे भयाण शांतता. आईलाही सुचेना. मुलीच्या समोर साक्षात मृत्यू उभा. इकडे आईने शेरीलच्या वडिलांना सांगितले. त्यांनी तत्काळ शेरीलच्या कंपनीला डेनाली प्रिन्सेसला फोन लावला. मदतीसाठी हाक दिली.

नॅशनल जिओग्राफिकवर प्रसारण
शेरीलच्या सुटकेचा थरार नॅशनल जिओग्राफिक चॅनलने चित्रित केला आहे. नॅटजिओच्या अलास्का स्टेट ट्रूपर्स या रिअ‍ॅलिटी शोमध्ये त्याचे लवकरच प्रसारण करण्यात येणार आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, नशीब बलवत्तर