आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International News In Marathi, America, Divya Marathi

मैत्रिणीच्या मुलाची हत्या प्रकरण अमेरिकेत महिलेस मृत्युदंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्युस्टन - अमेरिकेत मैत्रिणीच्या मुलाचा छळ करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एका महिलेस बुधवारी विषारी इंजेक्शन देऊन मृत्युदंड देण्यात आला. १९७६ नंतर मृत्युदंड झालेली ही १५ वी महिला आहे.

लिसा कोलमनवर ितची मैित्रण मर्सेला िवल्यम्सचा ९ वर्षीय मुलगा डेव्होन्टे याच्या मृत्यूप्रकरणी आरोप होता. लिसा त्याचा सांभाळ करत होती. मात्र, लिसा त्याला उपाशी ठेवून त्याचा छळ करू लागली. एके दिवशी हे बालक त्याच फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले तेव्हा त्याच्या शरीरावरही प्रचंड जखमा होत्या. त्याचे वजन अवघे ३६ पौंड होते.
२०००४ मध्ये घडलेल्या हत्याकांडाप्रकरणी खटला चालला. लिसा दोषी ठरली. ितला मृत्युदंडाची िशक्षा ठोठावण्यात आली.

महिलांना िवषारी इंजेक्शन देऊन मृत्युदंड ठोठावल्याची प्रकरणे अमेिरकेत अत्यंत कमी आहे. १९७६ पासून देशपातळीवर फक्त १५ महिलांना अशी िशक्षा ठोठावण्यात आली आहे. याउलट याच काळात १४०० पुरुष गुन्हेगारांना मृत्युदंड ठोठावण्यात आला.