आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International News In Marathi Israel Declared Dead A Soldier Feared Abducted By Hamas

बेपत्ता इस्रायली जवानाचा मृत्यू; गाझावरील हल्ले चालू राहिल, नेतान्याहू यांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जरूसलेम/ गाझा - इस्रायलने बेपत्ता जवान लेफ्टनंट हदर गोल्डिन याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आहे. हवाई हल्ल्यांच्या दरम्यान गाझापट्टीवरील 23 वर्षाचा जवान मारला गेला. त्याचे हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे, असे मानले जात होते. हमासची गाझामधील भूसुरूंगांवर हल्ले चालूच राहतील, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिला आहे. इस्रायली सेनेने गाझापट्टीवरील अनेक रणगाडे माघारी फ‍िरवले आहेत, असे इस्रायलच्या वृत्तवाहिनीनी दाखवले आहे. देशाच्या सीमावर्ती भागात असलेली हमासची भूसुरूंगे नष्‍ट करण्‍यात आली आहेत. 8 जुलैपासून सुरू झालेल्या इस्रायल-हमास हल्ल्यात आतापर्यंत 1 हजार 700 पॅलेस्टिनी नागरिक मारली गेली आहेत.

86 क्षेपणास्त्र हल्ले
गाझापट्टीवर शनिवारी (ता. दोन) 86 क्षेपणास्त्रांचे हल्ले करण्‍यात आले आहे, असे इस्रायलने सांगितले. 5 लाख 20 हजार लोक इस्रायल-हमास संघर्षात निर्वासित झाले आहेत, असे पॅलेस्टाइन सेंटर फॉर ह्यूमन राइटच्या अहवालात पुढे आले आहे.

उत्तर गाझामध्‍ये परतू शकतात पॅलेस्टाइन निर्वासित
संघर्षामुळे निर्वासित झालेले 70 हजार पॅलेस्टाइन नागरिक पुन्हा आपापल्या घरी जाऊ शकतात. हमासच्या स्फोटकांपासून सावध रहा, असे इस्रायली सैन्याने नागरिकांनी सांगितले.

पुढे पाहा बेपत्ता जवानाच्या कुटूंब....