आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International News In Marathi Israel Hamas Truce Crumbles

PHOTOS: काही तासही राहिली नाही शांतता, इस्रायली हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझा/ जेरूसलेम - इस्रायल-हमासमधील 72 तासांचा शस्त्रसंधी करार काही तासांतच मोडला. आज (शुक्रवार) करारानंतर इस्रायलने काही तासांत हवाई हल्ले सुरू केले. यात 40 जण मारले गेले आहेत. हमासने शस्त्रसंधीचे पालन न केल्याने हल्ले सुरू करण्‍यात आल्याचे स्पष्टीकरण इस्रायलने दिले आहे.
दक्षिण गाझामध्‍ये हमासने इस्रायली सैनिक हदर गोल्डिनचे अपहरण केले. यास इस्रायलच्या संरक्षण विभागाने तिजोरा दिला आहे. त्यामुळे हल्ले चालूच राहतील. लोकांनी घरात राहावे, असे इस्रायलकडून सांगण्यात आले आहे.
आतापर्यंत 1 हजार 499 पॅलेस्टाइन नागरिक या हल्ल्यांमध्ये मारली गेली असून 7 हजार जखमी झाली आहेत, असे बीबीसीने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

इस्रायली लष्कराकडून गाझावर सतत क्षेपणास्त्रांनी मारा चालू आहे. शस्त्रसंधीचा कोणताही परिणाम पाहावयास मिळत नाही, असे अल जजीराचा बातमीदार चार्ल्स स्टेफर्ड याने सांगितले. गाझावरील हल्ल्याबाबत यूनो आणि अमेरिकेने केलेल्या विनंतीवरून इस्रायल-हमासमध्‍ये 72 तासांकरिता शस्त्रसंधीचा करार झाला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा गाझाची ताजी छायाचित्रे...