आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International News In Marathi Israeli Fire Killed At Least 16 Palestinians In Gaza

शाळेवर केलेल्या हल्ल्यात 16 जणांचा बळी, इस्रायल शस्त्रसंधीसाठी तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेरूसलेम/गाझा - इस्रायल बुधवारी (ता.30) चार तासांकर‍िता शस्त्रसंधीसाठी तयार झाला आहे. तत्पूर्वी संयुक्त राष्‍ट्राच्या शाळेवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 16 पॅलेस्टाइन नागरिक मारली गेली. या घटनेनंतर इस्रायलने शस्त्रसंधीसाठी तयारी दर्शवली.
एक ध्‍वनीफीत समोर आली असून त्यात हमासचा सैन्य शाखेचा कमांडर मोहम्मद डेफ म्हणतो की, आमचे लोक मरायला तयार असून त्यांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र डागण्‍याचा पण केला आहे.
हमासची अनेक ठिकाणे बुधवारीच्या हल्ल्यात लक्ष्‍य करण्‍यात आली आहे, असे इस्रायलने सांग‍ितले आहे. आतापर्यंत हल्ल्यात 1 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला आहे. गाझापट्टीवर सर्वत्र क्षेपणास्त्रांचा आवाज ऐकू येत आहे.