आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International News In Marathi Israeli Fire Killed At Least 21 Palestinians In Gaza

गाझा संघर्ष : 23 दिवसांत 245 मुले, 140 मातांचा बळी! आतापर्यंत 1300 लोकांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझा / जेरुसलेम - 23 दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल-गाझा संघर्षात आतापर्यंत एकूण 1300 नागरिक मारले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र, एकमेकांच्या जिवावर उठलेले दोन्ही देश शांत व्हायचे नाव घेत नाहीत. या युद्धाची सर्वाधिक झळ मुलांना बसली आहे. आतापर्यंत 245 हून जास्त मुले आणि महिला ठार झाल्या आहेत. गेल्या सहा वर्षांतील हे सर्वात मोठे युद्ध आहे. युद्धात सात हजारांहून जास्त लोक जखमी, तर 2.15 लाख लोक बेघर झाले असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. या निर्वासितांनी संयुक्त राष्ट्राच्या शाळा आणि छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. बुधवारी अन्य एका घटनेत खान युनूस शहरातील बॉम्ब हल्ल्यात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला.

विरोध : स्फोटांच्या छायाचित्रात मुलांचे चेहरे
पॅलेस्टाइन तरुण इस्रायल हल्ल्याचा विरोध कलात्मक पद्धतीने करत आहेत. सोशल मीडियावर अशा प्रकारचे छायाचित्र पोस्ट केले जात आहे.

युनोच्या शाळेवर बॉम्ब, 70 ठार
इस्रायलने बुधवारी गाझापट्टीवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात संयुक्त राष्ट्राच्या शाळेतील 20 पॅलेस्टाइन नागरिकांसह 70 जण ठार झाले. या हल्ल्यात जवळपास 130 नागरिक जखमी झाले. शाळेमध्ये तीन हजार लोकांनी आश्रय घेतला आहे. शाळेवर महिनाभरात दुसर्‍यांदा हल्ला झाला आहे. गुरुवारच्या हल्ल्यात 16 जण ठार, तर 100 जखमी झाले होते.

पॅलेस्टाइन नेते कैरोला जाणार
पॅलेस्टाइन नेत्यांचा एक गट मानतावादी युद्धबंदी लागू व्हावी यासाठी कैरोला जाणार आहे. इस्रायल व हमासवर दबाव आणण्यासाठी ते जागतिक नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, बॉम्ब वर्षावात आईच्या कुशीचे सुरक्षा कवच