आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International News In Marathi Jihadi John London Rapper In Syria

अमेरिकी पत्रकाराचा शिरच्छेद करणारा \'जिहादी\', 10 कोटींचे घर विकून झाला दहशतवादी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- म्युझिक स्टुडिओत जिहादी जॉन.)
वॉशिंग्टन- अमेरिकी पत्रकार जेम्स फोले यांची गळा चिरुन हत्या करणाऱ्या ISIS च्या दहशतवाद्याची माहिती काढण्यासाठी अमेरिकी आणि ब्रिटन कसोशिने प्रयत्न करीत आहेत. या दोन्ही देशांच्या गुप्तचर संघटना लवकरच यासंदर्भात घोषणा करणार आहेत. परंतु, डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार, या 23 वर्षीय दहशतवाद्याला 'जिहादी जॉन' असे संबोधले जाते. त्याचे नाव अब्देल माजेद अब्देल बारी असे आहे.
तो लंडन येथील रहिवासी असून कधी काळी रॅपर म्हणून काम करीत होता. गेल्या वर्षी जिहादीच्या नावाखाली म्युझिक करिअर सोडून तो सिरियाला गेला. फेसबुक अकाऊंटवर त्याने अशा स्वरुपाचे अनेक फोटो टाकले आहेत.
लंडनमध्ये होते 10 कोटींचे घर
जिहादी जॉनने म्युझिक करिअरमध्ये अल जिनी छद्म असे नाव धारण केले होते. सिरियात जाण्यापूर्वी त्याने पश्चिम लंडनमध्ये असलेले 10 कोटी रुपयांचे घर सोडले. त्याने ट्विटरवर कापलेले शीर हातात घेऊन असलेला फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर ट्विटरने त्यावर बंदी घातली. मौलवी अंजेम चौधरी याच्या संपर्कात आल्यानंतर जॉन कट्टरपंथी झाला होता, असे बीबीसी रेडिओने सांगितले आहे.
वडील ओसामा बिन लादेनचे सहकारी
जिहादी जॉनचे वडील आदेल अब्देल बारी कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याचे सहकारी होते. सध्या ते अमेरिकेतील तुरुंगात आहेत. त्यांच्यावर तंजानिया आणि केनिया येथील अमेरिकी दुतावासांवर बॉम्बहल्ला करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या हल्ल्यांमध्ये 224 नागरिक मृत्युमुखी पडले होते. जिहादी जॉन जेव्हा केवळ सहा वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडीलांना लंडनमधील घरुन अटक करण्यात आली होती.
पुढील स्लाईडवर बघा, जिहादी जॉनचे हादरवून सोडणारे फोटो