आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंतरराष्‍ट्रीय राजकारण: सिरियावर हल्ला करू पाहणारी अमेरिका कंगाल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंटन - अमेरिकेवरील आर्थिक संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गडद होत चालले असून ऑक्टोबरपर्यंत त्यांच्याकडे केवळ तीन-चार दिवस खर्च भागवण्याइतकी 50 अब्ज डॉलर रक्कम (सुमारे 3.31 लाख कोटी रुपये) शिल्लक राहणार आहे. त्यानंतर अमेरिका आपल्या जवानांना वेतन आणि लोकांना सामाजिक सुरक्षेचे धनादेशही देऊ शकणार नाही.


ओबामा प्रशासनाने सोमवारी आर्थिक संकटाची स्पष्ट कबुली दिली. देश आता आणखी कर्ज घेण्याच्या स्थितीत नाही. देशावर आधीच 16.7 लाख कोटी डॉलरचे कर्ज आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे खर्चात कपात केली जात आहे. लोकांना नोक-यांवरून काढून टाकण्यात येत आहे. कर्मचा-यांना बळजबरी बिनपगारी रजेवर पाठवण्यात येत आहे. खर्च कपातीसाठी आणखी नव्याने कात्री लावण्यात येणार आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या कर्ज मर्यादेत वाढ किंवा त्यासाठी मध्यस्थी करण्यास नकार दिला आहे. आर्थिक संकटास त्यांनी देशाची संसद (काँग्रेस) आणि विशेषत: रिपब्लिकन पार्टीला जबाबदार धरले आहे.


काँग्रेसने कर्ज मर्यादा वाढवावी : अर्थमंत्री जॅक ल्यू यांनी सोमवारी खासदारांना पत्र लिहिले आहे. कर्जाची मर्यादा वाढवली नाही तर गुंतवणूकदार बाँड्समध्ये पैसे गुंतवणार नाहीत. त्यांनी आधीच कोट्यवधी डॉलरचे सरकारी बाँड खरेदी केले आहेत. कर्ज घेण्याची विद्यमान मर्यादा मेमध्ये निश्चित करण्यात आली होती.