आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Politics : Awami Legaue Set Up Power In Bangladesh

आंतरराष्‍ट्रीय राजकारण: बांगलादेशमध्‍ये अवामी लीग सरकार स्थापण्‍याच्या तयारीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - विरोधकांच्या बहिष्कारानंतर तीन चतुर्थांश बहुमत प्राप्त करणारा अवामी लीग बांगलादेशमध्ये सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. 300 सदस्यांच्या संसदेत पंतप्रधान शेख हसीना यांच्या पक्षाला 232 जागा मिळाल्या आहेत.
बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने सोमवारी रात्री विजयी उमेदवारांची यादी जाहीर केली. अवामी लीगचा सहकारी पक्ष जतिया पार्टीने 33 जागा जिंकल्या.
जतिया पार्टी मुख्य विरोधी पक्ष म्हणून काम करेल, अशी चर्चा आहे. सरकारमध्ये सहभागी व्हावे की विरोधी बाकावर बसावे याविषयी पक्षात एकमत नसल्याचे सांगण्यात येते. सत्ताधारी आघाडीचे तीन सहकारी पक्ष, वर्कस पार्टी, जतिया समाजतांत्रिक दल आणि जतिया पार्टी (मंजू) यांचे 12 उमेदवार निवडून आले आहेत.