आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर पाण्यासाठीच होईल तिसरे जागतिक महायुद्ध; जाणून घ्या, या मागची कारणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असून पाणी बदती ही काळाची गरज होऊन बसली आहे. यामुळेच पाण्याच्या बचतीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने 1992 मध्ये झालेल्या अधिवेशनात 22 मार्च हा 'जागत‍िक जल दिन' म्हणून निश्चित करण्‍यात आला. त्यानंतर 1993 मध्ये 22 मार्च रोजी पहिल्यांदा 'जागतिक जल दिन' म्हणूनही साजरा करण्‍यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर 'रियो डि जेनेरियो'मध्ये या दिवसाची सुरुवात झाली. पाणी बचतीबाबत जगभरात जागरुकता करणे हा प्रमुख उद्देश या मागे आहे.

पृथ्वीवर तीन भाग पाणी आणि एक भाग जमीन आहे. परंतु, असे असतानाही पिण्यायोग्य पाणी अल्प प्रमाणात आहे. . पाणी टंचाई दिवसेंदिवस भीषण होणार आहे. नद्यांमध्ये मोठ्याप्रमाणात केमिकल मिसळले जात आहे. परिणाम नद्या प्रदुषित होत आहेत. यासाठी पाणी प्रदुषित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. विशेष म्हणजे पाण्याच्या अपव्यय टाळला पाहिजे.

नाही तर पाण्यासाठीच होईल तिसरे जागतिक महायुद्ध...
जगातील 78 कोटी लोक असे आहेत, की त्यांना पिण्याजोगे पाणी मिळत नाही. मानवाला जगण्यासाठी लागणार्‍या
मुलभूत गरजांमध्ये पाण्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. भविष्यात पाणी टंचाईची समस्या आणखी गंभीर होईल.
कदाचित पाण्यासाठीच तिसरे जागतिक महायुद्ध होईल, असा इशाराही संयुक्त राष्ट्राने जागतिक जल दिनानिमित्त
दिलेल्या अहवालद्वारे दिला आहे.

2025 पर्यंत जगातील एक तृतिअंश देशात पाणी पेटणार असल्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले आहेत. आशिया खंडाबाबत सांगायचे झाले तर भारतात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. नद्यांचा प्रवाह आणि पाणी वाटपावरून भारत, पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशात अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, पाण्यासाठी अनेक देशाच्यां ‍निशाण्यावर भारत!