आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या युजर्समध्ये सर्वात जास्त इंटरनेट अॅडिक्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात सर्वाधिक लोकसंख्या असूनही इंटरनेट युजर्ससुद्धा चीनमध्ये सर्वात जास्त आहे. सरकारी आकडे सांगतात की, येथे ६५ कोटी इंटरनेट युजर्स आहेत. त्यात सर्वाधिक तरुणांचा भरणा आहे. ती शाळा-महाविद्यालयांत शिकणारी आहेत. ही संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पट आहे. इतकेच नाही तर स्मार्टफोनद्वारे इंटरनेटचा वापर करणारे हेच लोक आहेत. चीन इंटरनेट नेटवर्कच्या अहवालानुसार तेथे ५५ कोटी ७० लाख युजर्स केवळ स्मार्टफोन किंवा इंटरनेटचा वापर करतात. त्यात निम्मे युजर्स आॅफिस येण्या-जाण्यासाठी किंवा काम करताना खासगी वापरासाठी इंटरनेटचा वापर करतात.

चीनमध्ये शहरात सर्वाधिक गावात इंटरनेट युजर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. इस. २०१३ मध्ये ५. ४ कोटी आणि २०१४ मध्ये ५.७ कोटी स्मार्टफोनची विक्री झाली आहे. हे अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त आहेत. चीनसाठी सर्वात मोठी समस्या हीच ठरते आहे. येथे इंटरनेट नावाचा रोग पसरत चालला आहे. नुकतेच येथे लॅपटॉप फोडणे, स्वत:चा हात कापून घेणे किंवा डिप्रेशनमध्ये गेल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी टॅब्लेटची तोडफोड करण्याच्या बातम्या माध्यमामध्ये ठळक स्वरूपात प्रसिद्ध झालेल्या आहेत. २०१३ मध्ये असाच एक प्रकार उघडकीस आला होता की, एका युजरने तब्बल ६ वर्षे वेगवेगळ्या इंटरनेट कॅफेमध्ये घालवली होती. तेथेच झोपल्यानंतर तो काही खाण्यासाठी किंवा अंघोळीसाठी कधी-कधी बाहेर जात होता.
cac.gov.cn
पुढे वाचा युजर शोधतात नवे मार्ग...