आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरनेट ट्रॅफिक वाढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - आगामी चार वर्षांत जगातील इंटरनेट ट्रॅफिक तिपटीने वाढेल, अशी शक्यता नव्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. इंटरनेट आधारित उपकरणे आणि व्हिडिओ प्रसारणातील सुधारणेमुळे लोक ऑनलाइन फिफा वर्ल्डकप पाहत असल्याचे सांगण्यात येते.
मध्यपूर्व आणि आफ्रिकेत वेगाने वाढणारे इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) ट्रॅफिक रिजन ठरले आहेत. 2013 ते 2018 दरम्यान यामध्ये वार्षिक 38 टक्के वाढ होणे अपेक्षित असल्याचे सिस्कोव्हिज्युअल नेटवर्किंग इंडेक्स ग्लोबलने म्हटले आहे. ब्राझीलमध्ये सुरू असलेला फिफा वर्ल्डकप लाखो लोक ऑनलाइन पाहत आहेत. व्हिडिओ स्टिमिंग आणि आयपी प्रसारणाने 4.3 एक्झाबाइट इंटरनेट ट्रॅफिक व्यापली आहे.