आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Introduction Bill Pass In Cogress For International Yog Day, Gabard Said To PM

आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी काँग्रेसमध्ये ठराव मंजूर करू, गबार्ड यांची पंतप्रधान मोदी यांना ग्वाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या दौ-यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जावा यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली होती. त्याला आपला पाठिंबा असून काँग्रेसमध्ये यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात येणार असल्याचे हिंदू-अमेरिकी तुलसी गबार्ड यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

भारताने जगाला योग दिला. योग म्हणजे फक्त व्यायाम नव्हे. जागतिक शांतता, पर्यावरणाचे आव्हान पेलण्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची प्राचीन जीवनशैली आहे. योगाबाबतची चुकीची धारणा बदलण्याची वेळ आली आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाल्यास त्यातून जागृती होऊ शकेल, असे मोदी यांनी अमेरिकी दौ-यात म्हटले होते.
न्यूयॉर्कमध्ये असताना गबार्ड-मोदी यांची भेट झाली होती. मोदी यांच्याशी माझी अनेक विषयांवर चर्चा झाली होती.

भारताकडून निधी
संयुक्त राष्ट्राच्या महिला बळकटीकरण, स्त्री-पुरुष समानतेच्या कार्यक्रमासाठी भारताच्या वतीने सुमारे ६ कोटी १५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या रकमेचा धनादेश दिला. संयुक्त राष्ट्राच्या महिला विभागाकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. आंतरराष्ट्रीय संघटनेच्या महिला विभागाचा संस्थापक सदस्यांमध्ये भारताचा समावेश होतो.