आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iraland Citizen Demonstrate Against Abortion Law

'विधेयकाला मारा, मुलाला नको' च्या घोषणाने गर्भपात कायद्याविरोधात आयर्लंडमध्ये निदर्शने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आयर्लंडमध्ये गर्भपात कायद्यातील नवीन तरतुदीला नागरिकांनी कडाडून विरोध केला असून संतप्त नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले. ‘किल द बिल, नॉट द चाइल्ड! (विधेयकाला मारा, मुलाला नको)’ अशी घोषणाबाजी या वेळी नागरिकांनी केली. आईला धोका असल्यास गर्भपात करण्याची तरतूद प्रस्तावित विधेयकात आहे.


डबलिनच्या मुख्य रस्त्यावर सुमारे 35 हजार नागरिक उतरले आहेत. निदर्शकांनी महत्वाचे मार्ग बंद केले आहेत. ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. रॅली फॉर लाइफ नावाच्या संस्थेने याचे आयोजन केले आहे. या आंदोलनात 60 हजार नागरिकांचा सहभाग असल्याचा दावा संस्थेकडून करण्यात आला आहे. गर्भपातविषयक विधेयकाला कडाडून विरोध होत असला तरी आयर्लंडचे कायदामंत्री एलन शट्टर यांनी त्याचे जोरदार समर्थन केले आहे.