आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणमध्ये ‘बार्बी’ वर बंदी !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेहरान। जगभरात गाजलेल्या बार्बी या बाहुलीच्या विक्रीवर इराणने बंदी घातली आहे. देशातील खेळणीच्या अनेक दुकानांना बार्बीची विक्री न करण्याची ताकीद देण्यात आली आहे. राजकीय पातळीवर विरोध करणा-या इराणने या माध्यमातून आता सांस्कृतिक पातळीवरही पाश्चात्यांशी दोन हात करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
बार्बी हटाव मोहिमेला शुक्रवारी तेहरानमधून सुरुवात करण्यात आली. पोलिसांनी बाजारपेठेतील अनेक दुकानांत जाऊन बार्बी बाहुल्यांची विक्री केली जाऊ नये, अशी स्पष्ट ताकीदही दुकानदारांना देण्यात आली आहे. त्यामुळे तेहरणामधील खेळणी विक्रेत्यांच्या व्यवसायावर
संक्रांत आली आहे. 1979 मध्ये इस्लामिक क्रांतीच्या वेळीदेखील देशातील पाश्चात्य संकेतांना हटवण्याचे काम इराणमध्ये झाल्याचा इतिहास आहे. बार्बीची जादू जेवढी अमेरिका, युरोपात दिसते.