आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतराष्‍ट्रीय राजकारण: तेहरानजवळ इराणची भूमिगत अणुभट्टी तयार होतेय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - इराण गुप्त पद्धतीने भूमिगत अणुभट्टी तयार करत असून त्याचे ठोस पुरावे आपणाकडे असल्याचा दावा इराणी बंडखोर गटाने केला आहे. संयुक्त राष्‍ट्र अणू देखरेख पथक आरोपाची चौकशी करणार आहे. बंडखोरांना दावा इराणच्या धोरणाचा एकत्रित परिणाम असल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.


डिसिडेन्ट नॅशनल कौन्सिल ऑफ रेझिस्टन्स ऑफ इराण (एनसीआरआय) नावाच्या या संघटनेने इराणमधील भूमिगत अणुभट्टीचा पर्दाफाश केला आहे. मात्र, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे काम सुरू आहे, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. एनसीआरआयने 2002 मध्ये इराणच्या नतांजामध्ये संपृप्त युरेनियम केंद्र व अरकमध्ये हेलिकॉप्टर केंद्र असल्याचा दावा केला होता.


कुठे मिळाले : निर्वासित बंडखोर गटाच्या म्हणण्यानुसार, ‘पीपल्स मुजाहिदीन ऑर्गनायझेशन ऑफ इराण’च्या अहवालावरून नव्या अणुकेंद्राची माहिती मिळाली. नवे केंद्र तेहरानपासून 50 कि.मी. अंतरावर वायव्येला डोंगरामध्ये बोगदा खोदून उभारले जात आहे. 2006 मध्ये याचा पहिला टप्पा सुरू होऊन केंद्राचे काम पूर्ण झाले आहे.