आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iran Hostage Crisis American 444 Days In Captivity

RECALL: महासत्ता अमेरिकेलाही या देशासमोर टेकावे लागले होते गुडघे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
21 जानेवारी 1981 मध्‍ये अमेरिकेच्‍या 52 नागरिकांना इराणने सोडून दिले. या घटनेला आज 34 वर्षे पूर्ण होत आहेत. इराणमध्‍ये ओलिस असलेल्‍या 52 नागरिकांना सोडवण्‍यासाठी मात्र अमेरिकेसारख्‍या बलाढ्य राष्‍ट्रालाही इराणकडे याचना करावी लागली होती. अमेरिकन नागरिकांना सुखरूप इराणच्‍या बाहेर काढण्‍यासाठी अमेरिकेच्‍या नाकेनऊ आले होते. 1981 मध्‍ये इराणवर लादण्‍यात आलेले सर्व निर्बंध अमेरिकेला उठवणे भाग पडले होते.
इराणने ओलीस ठेवलेल्‍या 52 नागरिकांपैकी कुटनयीक आणि तेहरानमधील दूतावासातील अधिकारी असल्‍यामुळे अमेरिकेला इराणच्‍या सर्व मागण्‍या मान्‍य करणे भाग पडले. 1979 च्‍या दरम्‍यान इस्‍लामिक क्रांती कार्यात सहभागी झालेले यूवक-विद्यार्थ्‍यांच्‍या एका दलाने या दूतावासातील अधिका-यांना वोलिस ठेवले होते.
का केले अमेरिकेला युवकांनी टारगेट-
अमेरिकेचा हस्‍तक म्‍हणून ओळखल्‍या जाणारा इराणचा शहा मोहम्मद रेजा याच्‍या जाचाला कंटाळलेल्‍या इराणच्‍या नागरिकांनी शहा मोहम्मद रेजा विरोधात बंड पूकारले होते. हे बंड शमवण्‍यासाठी अमेरिकेची मदत रेजा घेत होता. मात्र त्‍याला क्रांतिकार्यात सहभागी झालेल्‍या नागरिकांचा असंतोष दडपवता आला नाही. शेवटी आजाराचे कारण सांगून मोहम्मद अमेरिकेत पळून गेला. अमेरिकेने शाह मोहम्मद रेजाला इराणमध्‍ये पाठवण्‍याबरोबच इराणवरचे सर्व निर्बंध उठवावेत यासाठी अमेरिकेच्‍या दुतावासातील अधिका-यांना इराणच्‍या युवकांनी ओलिस ठेवले होते. त्‍यांच्‍या मागण्‍या अमेरिकेला पूर्ण कराव्या लागल्‍या. तेव्‍हा कुठे अमेरिकन नागरिकांची सुटका झाली.
पुढील स्‍लाईडवर पाहा अमेरिकच्‍या नागरिकांना सुटका करण्‍यात येत असतानाची छायचित्रे...