आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिआल संकटात: इराणच्या चलनावर प्रथमच निर्बंध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेने इराणची आर्थिक नाकेबंदी करण्याचा चंग बांधला असून एकाच आठवड्यात तिसर्‍यांदा निर्बंधाची कारवाई केली आहे. या वेळी अमेरिकेने अगोदरच अवमूल्यन झालेल्या रिआल या चलनास लक्ष्य केले आणि देशाच्या ऑटोमोबाइल उद्योगाला धक्का दिला आहे.
अमेरिकेने पहिल्यांदाच इराणी चलनाला लक्ष्य केले. इराणसोबत कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक व्यवहार केल्यास विशिष्ट पॅनल्टीला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 2012 पासून इराणच्या रिआलचे अवमूल्यन सुरू आहे. आतापर्यंत रिआल चलन दर निम्म्याहून खाली गेला आहे, परंतु पहिल्यांदाच रिआलमधील व्यापाराला थेटपणे लक्ष्य करण्यात आले आहे. इराणी चलन खरेदी किंवा विक्री करण्यास अमेरिकेने निर्बंध टाकले आहेत.
जे देश इराणसोबत उत्पादन, सेवेमार्फत संबंध ठेवतात. त्यांनी तत्काळ हे संबंध संपुष्टात आणावेत, यासाठी हे निर्बंध लादले. जगासाठी धोकादायक असलेल्या इराणचा अणू कार्यक्रम रोखण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे, परंतु हा प्रतिबंध नाही, शस्त्र नाही, थोपवण्याचाही प्रकार नाही, असे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी स्पष्ट केले आहे.

किती निर्बंध ?
अमेरिकेने आतापर्यंत इराणवर नऊ वेळा निर्बंध लादले आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिकेने इराणच्या 50 पेट्रोकेमिकल कंपन्यांना काळ्या यादीत टाकले होते. त्याचबरोबर जहाज, जहाज बांधणी, ऊर्जा क्षेत्रातही इराणवर निर्बंध लादण्यात आले होते.

काय आहे ठपका ?
इराण गुप्त पद्धतीने अणू कार्यक्रम राबवत आहे. त्याचा धोका संपूर्ण जगाला आहे, असा ठपका पाश्चात्त्य समुदायाकडून वारंवार करण्यात येतो, परंतु हा कार्यक्रम अणू ऊर्जेसाठी चालवला जात असल्याचे सांगून इराणने आपल्या कृतीचे समर्थन केले आहे.

चीनची व्यूहरचना
बीजिंग- अमेरिकेच्या सागरी क्षेत्र परिसरात समुद्री व्यूहरचना करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीने ही योजना आखली आहे. चिनी सागरी किनारपट्टी भागात जहाजे आणि विमाने पाठवण्यात येणार आहेत. या हालचालींमुळे चीनच्या सागरी धोरणांत बदल होत असल्याचे हे संकेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कधीपासून अंमलबजावणी ? : इराणवर निर्बंध लादण्याचा आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काढला असून त्यावर त्यांची स्वाक्षरी आहे. त्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे.

विषारी पत्र पाठवल्याबद्दल दोषी : राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना विषारी पत्र पाठवणारा मिसिसिपीतील आरोपी दोषी असल्याचे फेडरल ग्रँड ज्युरींनीं स्पष्ट केले आहे. जेम्स एव्हरीट डस्टशेक (41) असे या दोषीचे नाव आहे. तो ऑक्सफर्ड न्यायालयात दोषी ठरला तर त्यास जन्मठेप आणि 2 लाख 50 हजार डॉलर्सचा दंड होऊ शकतो.