आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणमध्ये 2.6 अब्ज डॉलरचा घोटाळा, उद्योगपतीला फाशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेहरान- इराणमध्ये अब्जाधीश उद्योगपती महाफरीद आमिर खोसरावी यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शनिवारी फासावर लटकवण्यात आले. बनावट कागदपत्रांच्या साह्याने अनेक बँकांकडून कर्ज घेऊन त्यांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात खोसरावी यांना दोषी ठरवण्यात आले होते. हा घोटाळा सुमारे 2.6 अब्ज डॉलरचा आहे.

देशातील हा सर्वात मोठा घोटाळा मानला जातो. खोसरावी यांना तेहरानच्या उत्तरेकडील अ‍ॅविन तुरुंगात शनिवारी सकाळी फाशी देण्यात आली. या प्रकरणात आणखी तीन जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

खोसरावी ऊर्फ आमिर मन्सूर आरिया यांनी इराणच्या सर्वाेच्च् बँकिंग संस्था बँक सदारतकडून कर्ज घेण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली होती. त्यांनी या माध्यमातून कुझेस्तान स्टील कंपनीसारख्या बड्या सरकारी कंपन्यासह काही संपत्तीदेखील खरेदी केली होती.