आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणने पाठवले अंतराळात माकड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


तेहरान - इराणने सोमवारी अंतराळात माकड पाठवले. त्यामुळे मानवी अंतराळ यान पाठवण्याचा इराणचा मार्ग प्रशस्त झाला आहे, असे संरक्षणमंत्री अहमद वाहिदी यांनी सरकारी दूरचित्रवाणीवरून सांगितले.


इराणने अंतराळात धाडलेल्या कॅप्सूलमध्ये 120 किलोमीटर उंचीवर अंतराळात प्रवास करून हे माकड जिवंत परतले, असे अल-आलम या अरबी आणि अन्य भाषिक वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. या यशामुळे मानवी अंतराळ मोहिमेचा आमचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र, मानवी मोहीम अंतराळात धाडणे ही दीर्घकालीन प्रक्रिया असल्याचे जनरल वाहिदी यांनी सांगितले. विशेष म्हणजे 2011 मध्ये अंतराळात माकड पाठवण्याचा इराणचा प्रयत्न फसला होता. 2020 मध्ये अंतराळात माणूस पाठवण्याची घोषणा इराणने जानेवारीच्या मध्यास केली होती.