आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेने इराणच्या 8 पेट्रोलियम कंपन्या टाकले काळ्या यादीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेने शनिवारी पहिल्यांदाच इराणच्या पेट्रोलियम उद्योगाला लक्ष्य केले. इराणच्या आठ कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. इराणला कोणत्याही प्रकारची मदत न करण्याचा इशारा अमेरिकेने इस्लामी देशांना दिला आहे.


अणू कार्यक्रम चालवण्यासाठी इराण सर्वाधिक विदेशी चलन तेल निर्यातीमधून मिळवते. त्यामुळे अमेरिकेने त्या देशाच्या मुळावर घाव घालण्याचा यातून प्रयत्न केला आहे, असे एका अमेरिकी अधिका-याने सांगितले. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर इराणकडून अणुविषयक धोरणात बदल करण्याची भीती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर देशावरील निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
निवडणुकीनंतर त्यांच्या मूळ स्वभावात काही बदल होईल, असे मला वाटत नाही. उलट त्यांचे धोरण अधिक आक्रमक होण्याची भीती वाटते. इराण सरकारने अणू कार्यक्रमापासून दूर राहावे यासाठी त्यांचे मन वळवण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे.