आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iranian Negotiators Reject Hardline Criticism Of Nuclear Talks

क्षेपणास्त्रावर वाटाघाटीस इराणचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेहरान - इराणच्या आण्विक कार्यक्रमाबाबत जागतिक महासत्तांशी सुरू असलेल्या वाटाघाटीदरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत अजिबात चर्चा करण्यात येणार नाही, असे इराणच्या संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेवर सविस्तर चर्चा करण्याची गरज असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अणूविषयक मध्यस्थ वेंडी शेरमन यांनी म्हटले होते. त्यावर इराणचे संरक्षणमंत्री जनरल होस्नी देहगान यांनी आण्विक वाटाघाटींचा क्षेपणास्त्र क्षमतेशी कोणताच संबंध नसल्याचे म्हटले आहे.