आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणचे राष्ट्रपती अहमदीनेजाद यांच्यावर कुठे हार तर कुठे बुट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराणमध्ये १९७९ मध्ये झालेल्या इस्लामी क्रांतीनंतर पहिल्या वेळेस इस्त्राईलमध्ये आलेले इराणचे राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांचे मच्या उतसाहात स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर काही विरोधी संघटनांनी त्याच्याविरोधात आंदोलनही केले.

अहमदीनेजाद एका मुस्लिम संमेलनासाठी तीन दिवसीय इस्त्राईल दौ-यावर आहेत. येथील शिया समुदायाची प्राचीन मस्जीद अल हुसैन मध्ये ते गेले असताना मस्जिद बाहेर त्यांच्या विरोधात निदर्शने सुरु होती. सिरीया प्रकरणार इराणने घेतलेल्या भूमिकेचा विरोध आंदोलक करत होते.

आंदोलकांमधून एकाने त्यांच्या दिशेने बुट फेकून मारला. इस्त्राईलच्या सुरक्षा रक्षाकांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

सिरीयाचे राष्ट्रपती बशर अल असद यांच्या विरोधात गेल्या २२ महिन्यांपासून हिंसक आंदोलन सुरु आहे. यात इराणच्या राष्ट्रपतींनी असद यांचे समर्थन केले होते. मात्र, इस्त्राईलचा त्यांना विरोध राहिला आहे. इराणमध्ये शिया समुदायाचे सरकार आहे तर, इस्त्राईलमध्ये सुन्नी समुदायाचे सरकार आहे. इराणमध्ये क्रांती झाल्यानंतर तेथील शाहने इस्त्राईलमध्ये शरण घेतली होती, त्यानंतर १९७९ पासून दोन्ही देशातील संबंध खराब झाले.