आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iranian Teacher Use Robot To Encourage Children For Prayer

NEW TREND: इराणमधील एका शाळेत मुलांना प्रार्थनेचे धडे देतोय रोबोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोजची प्रार्थना मुलांना कंटाळवाणी वाटू नये म्हणून इराणमधील शिक्षकांनी एक शक्कल लढवली आहे. प्रार्थना मुलांना आवडावी यासाठी या शिक्षकांनी रोबोटची मदत घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या युक्तीला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तेहरानपासून 35 किलोमिटर अंतरावर असणा-या वारमिन शहरातील अलबरोज शाळेतील अकबर रिजी नावाचा शिक्षक मुलांना कुराणची शिकवणूक देत असतो.

अकबर एका कौटूंबिक कार्यक्रमात गेले असताना नृत्य आणि गाणी सादर करणा-या बाहूलूसोबत लहान मुले खेळत असल्याचे त्यांनी पाहिले आणि धार्मिक आणि मनोरंजनाच्या कामात आपण अशा प्रकारे उपकरण वापरू शकतो ही कल्पना त्यांना सुचली.

अकबर यांनी कोरियाच्या एका रोबोट कंपनीकडून अभ्यासाची एक किट विकत घेऊन ती रोबोटमध्ये फिट केली. हा रोबोट वाकू शकतो आणि कुराणातील अध्याय गाऊ शकतो. या रोबोटमध्ये दोन इंजन लावण्यात आले आहेत. हा रोबोट जेव्हा कुराणातील अध्याय गात असतो तेव्हा मुले फारच लक्षपूर्वक ऐकतात आणि प्रार्थनेत सहभागी होतात, असे अकबर सांगतात. या रोबोटचे पेटेंट मिळवण्यासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे.