आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iranian Youth Challenge Strict Islamic Code, Divya Marathi

इराणमधील कडक इस्लामी कायद्यांची उडवली जाते खिल्ली, लपून-छपून होतात पार्ट्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लाल लिपस्टिक लावताना युवतीने आपला सेल्फी घेतली) - Divya Marathi
(लाल लिपस्टिक लावताना युवतीने आपला सेल्फी घेतली)
तेहरान - एका घरात सहा तरूण व्होडकाचा आस्वाद घेत आहेत आणि पार्टी करत आहे. दुसरीकडे एका छायाचित्रात तेहरानच्या पार्कमध्‍ये काही मित्रांराबरोबर मारीजुआनाचा धुर प‍िताना. कादाचित असे छायाचित्र पाहुन तुम्हाला आश्‍चर्य वाटणार नाही. कारण असे दृश्‍य सामान्य झाले आहे. परंतु तुम्हाला हे कळाले तर, हे चित्र आहे इराणमधील. तुम्ही नक्की विचार करायला लागताल. इराण हे कट्टर इस्लामि‍क राष्‍ट्र आहे. परंतु डेली मेल वेबसाइटने प्रसिध्‍द केलेल्या छायाचित्रांमध्‍ये तरूण वर्गांने कडक अशा नियमांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. येथे तरूणवर्ग पार्ट्या आयोजित करतो, प्लास्टिक सर्जरी आणि अयातुल्लाच्या छायाचित्रावर मारिजुआना ठेवून पितात. देशातील हायप्रोफाइल लोकांची मुले तेहरान, शिराज, कारमन, बशर, इस्फाहान आणि अहवाज सारख्‍या मोठ्या शहरांमध्‍ये अभ्‍यासादरम्यान बंद खोल्यांमध्‍ये इस्लामला मान्य नसलेले उद्योग करतात.

तरूणवर्ग सिटी पार्कच्या छुप्या कोप-यात, घरांमध्‍ये आणि शहराच्या मध्‍य सिटी सेंटर्समध्‍ये पार्ट्या करतात. या जागा सरकारी नियंत्रणापासून दूर आहेत. काही मुली मेकअप करतात. आपल्या चेह-यावरील बुरखा काढून टाकते आणि पुन्हा चेह-यावरील थोडे केस मागे सरकवते. परंपरावादी मुस्लिमांना असे कृत्य अमान्य आहेत. अविवाहित जोडपे सार्वजनिक स्थळावर एकमेंकांचे हात हातात घेऊन थांबलेली आहेत. पाश्‍चात्त्यांचा तिरस्कार करणारे अनेक तरूणवर्ग पाश्‍चात्त्य पॉप संगीतावर ठुमका धरत आहे.
आता येथे प्लास्ट‍िक सर्जरी महिला-पुरूषांमध्‍ये हळुहळू सर्वसामान्य होत आहे. प्रत्येक ऑपरेशनचा खर्च हा एका महिन्याच्या पगारापेक्षा जास्त असतो. येथे तुम्हाला बिना बुरख्‍यातील इराणी युवती दिसत आहेत.

पुढे वाचा....जागतिक संस्कृती जाणण्‍यासाठी घेतला जात आहे इंटरनेटचा आधार