Home | International | Other Country | iraq bomb blast 12 dead

इराकमधील बॉम्बस्फोटात 12 ठार

वृत्तसंस्था | Update - Dec 26, 2011, 11:39 PM IST

इराकमध्ये गेल्या चोवीस तासांत झालेल्या दोन बॉम्बस्फोटात 12 जणांची हत्या झाली. यात 36 जण जखमी झाले.

  • iraq bomb blast 12 dead

    बगदाद - इराकमध्ये गेल्या चोवीस तासांत झालेल्या दोन बॉम्बस्फोटात 12 जणांची हत्या झाली. यात 36 जण जखमी झाले.
    राजधानीतील सुरक्षित समजल्या जाणा-या गृह मंत्रालयाच्या इमारतीबाहेर झालेल्या आत्मघाती कार हल्ल्यात सहा लोकांचा मृत्यू झाला तर 34 जण जखमी झाले. पोलिस व रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की, कारमध्ये बसलेल्या हल्लेखोराने गृहमंत्रालय इमारतीबाहेरील प्रतिबंधित परिसरात प्रवेश करून स्वत:ला उडवून दिले.
    या हल्ल्यात सहा लोकांचा मृत्यू झाला. मृतांत चार पोलिसांचाही समावेश आहे. या स्फोटामुळे परिसरात उभ्या असलेल्या वाहनांनीही पेट घेतला. सुन्नी उपराष्ट्रपती तारिक अल हाश्मी यांच्या अटकेनंतर नाराज दहशतवाद्यांनी गृह खात्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, असे एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने सांगितले. हाश्मी यांनी देश सोडून स्वायत्त शासित प्रदेश कुर्दिस्तानात पलायन केले आहे. पंतप्रधान नुरी अल मलिकी यांनी काही दिवसांपूर्वी कुर्दिस्तानला हाश्मी यांच्यासंदर्भात आवाहन केले होते.

Trending