बगदाद - इस्लामिक दहशतवादी संघटना आयएसआयएसला टक्कर देण्यासाठी इराकने रशिया व बेलारूसकडून लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. अमेरिकेकडून F-16 लढाऊ विमाने येण्यास उशीर होणार असल्याने आम्ही रशियाकडून ती घेतली, असे इराकचे पंतप्रधान नूरी अल मलिकी यांनी सांगितले. खरेदी केलेली लढाऊ विमाने जुनी आहेत. दोन-तीन दिवसात ते बगदादमध्ये पोहोचतील, देवाची इच्छा असेल, तर एका आठवड्यात आमची सैन्य ताकद दुप्पटीने वाढेल आणि दहशतवादृयांचा खात्मा होईल, असे मलिकी यांनी स्पष्ट केले.
36 F-16 विमानांच्या सौद्याला अमेरिका विलंब करत असून त्याबद्दल आम्ही त्यांची निंदा करत आहे, असे बीबीसी अरबला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये मलिकी यांनी सांगितले. लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहाराचा कॉन्ट्रॅक्ट मंजुर करताना आम्हाला अांधरात ठेवण्यात आले.
इराकची संरक्षण शक्ती वाढवण्याकरिता आम्ही फक्त अमेरिकन जेटची खरेदी करत नाही, तर ब्रिटिश, फ्रेन्च आणि रशिया या देशांकडूनही विमानांची खरेदी करण्यात येणार आहे. जर आमच्याकडे अगोदरच शक्तीशाली हवाई शक्ती असती, तर दहशतवाद्यांचा प्रभाव वाढला नसता, असे त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केले.
अमेरिका लवकरच दोन F-16 विमानांची पहिली ऑर्डर इराकला पोहोचवणार आहे, असे पेंटागॉनचे प्रवक्ता आर्मी कर्नल स्टीव्ह वॉरेन यांनी वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आयएसआयएसने मसूल शहरावर ताबा मिळवल्यानंतर नूर अल मलिकीने अमेरिकेकडे सैन्य मदत मागितली होती. बराक ओबामा यांनी 300 सैन्य सल्लागार इराकमध्ये पाठवले जातील, असे सांगितले होते.
बगदादजवळी चार तेलक्षेत्रांवर दहशतवाद्यांचे वर्चस्व
आयएसआयएसने इराकमधील चार तेलसाठ्यांवर वर्चस्व मिळवले आहे. यामुळे दहशतवाद्यांचा खूप मोठा विजय झाला आहे, असे मानले जाते. दहशतवाद्यांनी एका रात्रीत मन्सूरियत अल-जबल या तेलसाठ्यावर वर्चस्व मिळवले आहे. येथे अनेक परदेशी ऑईल कंपन्याही आहेत.
पुढे पाहा शिया कसे दहशतवाद्यांशी चारहात करण्यासाठी तयार आहेत आणि इराकमधील सद्यस्थिती दाखवणारी छायाचित्रे.....